ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
या वेळापत्रकानुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 13 सप्टेंबर, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 11 ऑक्टोबर आणि अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा 1 नोव्हेंबर होणार आहे. एमपीएससीने या संदर्भातील माहिती आपल्या वेसाईटवर प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, कोरोना च्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा स्थगित केल्यावर विद्यार्थ्यांकडून परीक्षेचे पुढे काय होणार, तसेच लवकरात लवकर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे अशी मागणी केली जात होती. त्यानंतर अखेर आज आयोगाकडून प्रसिध्दी पत्रक जाहीर केल्याने सर्व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.