ऑनलाईन टीम / मुंबई :
नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारी (4 फेब्रुवारी) विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसने पत्रक काढून नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती दिली.
मिळालेल्या माहितनुसार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह सहा कार्यकारी अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरीफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हांडोरे आणि प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांची निवड झाली आहे.
तर दहा उपाध्यक्षांमध्ये शिरीष मधुकरराव चौधरी, रमेश आनंदराव बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत प्रताप कांबळे, कैलास कृष्णराव गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, एम एम शेख, माणिक मोतीराम जगताप यांची नेमणूक झाली आहे.
- संसदीय समितीमधील नावे खालील प्रमाणे :
दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर नाना पटोले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेसला एक नंबरचा पक्ष करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला.