रस्ता फोडून केली दुरुस्ती : हजारो लीटर पाण्याची बचत
प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिन्यांना विविध ठिकाणी गळती लागल्याने पाणीपुरवठय़ात व्यत्यय निर्माण होत आहे. आयएमईआर परिसरात जलवाहिनीला गळती लागल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात होते. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले.
घुमटमाळ येथील पाणीपुरवठा केंद्राद्वारे वडगाव, शहापूर, जुने बेळगाव अशा विविध भागात पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे याठिकाणी मोठय़ा आकाराच्या जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. वडगाव, जुनेबेळगाव परिसराला पाणीपुरवठा करणाऱया मुख्य जलवाहिनीला आयएमईआरसमोर मोठय़ा प्रमाणात गळती लागली होती. मात्र दुरुस्ती करण्यापूर्वीच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे गळतीद्वारे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जात होते. सातत्याने तक्रार करूनही पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले होते. त्यामुळे दररोज शेकडो लीटर पाणी वाया जात होते. याबाबत वरि÷ अधिकाऱयांकडे आणि महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर जलवाहिनीच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळाला. दोन दिवसांपूर्वी जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात आले. यामुळे गळतीद्वारे वाया जाणाऱया पाण्याची बचत झाली आहे. दुरुस्तीसाठी काँक्रिटीकरण करण्यात आलेला रस्ता काही प्रमाणात फोडावा लागला. मात्र पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणाऱया पाण्याची बचत झाल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.