ऑनलाईन टीम / जम्मू :
नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख फारुख अब्दुल्ला यांची नजरकैद्येतून सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश जम्मू-काश्मीर सरकारने जारी केला आहे. जम्मू काश्मीर सरकारने याची माहिती स्थानिक न्यायालयासह जम्मू काश्मीर पोलिस आणि इतर महत्वाच्या कार्यालयांना पाठवली आहे.
जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्याचा निर्णंय केंद्र सरकारने घेतल्यानंतर तत्काळ प्रभावाने माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह, त्यांचे पुत्र माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि पिपल्स डेमोपेटिक पार्टीच्या प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती या तिघांना सरकारने त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले होते. दरम्यान, शरद पवार यांनी नजरकैद मागे घेण्याची मागणी केली होती.
दरम्यान, डॉ. अब्दुल्ला यांना 15 सप्टेंबर 2019 पासून जनसुरक्षा कायद्यानुसार नजरकैदेत ठेवण्यात आले होते. कलम 370 हटवून 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आला होता.