शहरातल्या 253 तृतीय पंथीयांना मिळणार पोर्टल
सुधाकर काशीद/कोल्हापूर
हे धड पुरुष नाहीत, धड महिला नाहीत. मग आपण उपहासाने यांची ओळख छक्का किंवा हिजडा अशी केलेली. त्यांना समाजात मानाचे स्थान नाही. त्यांची टिंगल-टवाळी मात्र ठरलेली. कोणतीही ओळख नसलेल्या चेहऱयाची ही माणसं तशी अधांतरीच. पण शहरातील अशा 253 चेहऱयांना उद्या थर्ड जेंडर म्हणून अधिकृत ओळख मिळणार आहे. मी स्त्राr नाही, पुरुष नाही, पण तृतीय पंथी आहे असे ते अधिकृतपणे म्हणू शकणार आहेत. आणि उद्या त्यांची नोंदणी झाली की ते त्या क्षणापासून तृतीयपंथीयांच्यासाठी खास असलेल्या शासकीय सवलती योजनांचे लाभार्थी ठरणार आहे. कोल्हापूर समाज कल्याण विभागाने उद्या खास याच उपक्रमासाठी आपला सारा दिवस राखून ठेवला आहे.
तृतीयपंथी म्हणजे त्यांच्या हातात जोगवा मागण्यासाठी परडी किंवा टाळी वाजवत पैसे गोळा करायचे. हे चित्र बदलायला या शासकीय अधिकृत यामुळे मदत होणार आहे. `मी तृतीयपंथी’ अशी आपली अधिकृतपणे ओळख सांगत ते आता शासकीय लाभ हक्काने घेऊ शकणार आहेत. समाजातल्या एका अतिशय उपेक्षित घटकाला यामुळे शासकीय स्तरावर सन्मान मिळणार आहे.
केंद्र सरकारने या तृतीयपंथीय यासाठी थर्ड जेंडर म्हणून अधिकृत घोषणा केली आहे. पण त्याचा लाभ आजवर कोल्हापुरातील फक्त दोघाजणांनी घेतला आहे. कारण या तृतीयपंथी यातील संपर्काचा, माहितीचा अभाव काही कागदपत्रांची पूर्तता करण्यात आलेल्या अडचणी यामुळे नोंदणीकृत 253 तृतीयपंथी थर्ड जेंडर या शासकीय अधिकृत ओळखी पासून दूर होते. अर्थातच त्यांच्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकार पुरस्कृत योजना असूनही ते त्यांच्या लाभापासून दूर होते.
याच पार्श्वभूमीवर उद्या समाज कल्याण विभाग, सायबर कॉलेज तृतीयपंथीयांची संघटना यांनी एकत्र येऊन थर्ड जेंडर शासकीय प्रमाणपत्र देण्याचे ठरवले आहे. केंद्र सरकारने नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर तयार केले आहे. त्यावर या 253 तृतीयपंथीयांची नोंद केली जाणार आहे. सकाळी दहा ते दोन या वेळेत सायबरमध्ये त्यासाठी तृतीयपंथी एकत्र येणार आहेत. आणि आपल्याला एक नवा चेहरा मिळवणार आहेत.
…कसे जगतो हे आम्हालाच माहीत
टिंगल-टवाळीचा विषय आहे. छक्का म्हणून विचीत्र ओळख आमच्या वाटÎाला आली आहे. कोणी हौसेने तृतीयपंथी होत नाही. आयुष्यात अशी काही वेळ येते की छक्का म्हणून आमची ओळख बनून जाते. आमची व्यथाही लोकांना करमणूक वाटू लागते. आम्ही कसे जगतो हे फक्त आम्हालाच माहीत असते. आता शासनाने आम्हाला थोडाफार आधार दिला आहे. – एक तृतीयपंथी.
हे समाजाचा घटकच….
तृतीयपंथी हे समाजाचा घटकच आहेत. त्यांची पोर्टलला नोंदणी करणे ही महत्त्वाची शासकीय प्रक्रिया आहे. विशेष मोहीम घेऊन आम्ही सायबरच्या सहाय्याने ही प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सन्मान देत आहे. – विशाल लोंढेसमाज कल्याण विभाग उप आयुक्त.