ऑनलाईन टीम / मुंबई :
कार्डेलिया क्रूझवरील कारवाईनंतर चर्चेत आलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची अखेर डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स) विभागामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे.
वानखडे यांनी सप्टेंबर 2019 मध्ये एनसीबीचा पदभार स्विकारला होता. त्यांचा कार्यकाळ ऑगस्टमध्येच संपला होता. मात्र त्यांना 4 महिने एक्स्टेन्शन मिळालं होतं. मात्र, त्यांची मुंबई एनसीबीतून बदली करायची की एनसीबीमध्येच मुदतवाढ द्यायची? यावर विचार सुरू होता. वानखेडे यांच्यासाठी दिल्लीत भाजपचे नेते लॉबिंग करत असल्याचा आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी नुकताच केला होता.
कार्डेलिया क्रूझवरील कारवाईत आर्यन खानला अटक केल्यानंतर वानखेडे चर्चेत आले होते. आर्यनची अटक ही वसुलीसाठी करण्यात आली होती, तसेच वानखेडे यांनी जातीची बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवली. धर्मही लपवला, असे अनेक आरोप नवाब मलिक यांनी केले होते.