वृत्तसंस्था /मुंबई :
सलग घसरणीचा प्रवास नोंदवल्यानंतर अखेर चौथ्या दिवशी गुरुवारी सेन्सेक्स तेजीची उसळी प्राप्त करत बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील कामगिरीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग जोरदार तेजीत राहिल्याने सेन्सेक्सला 646 अंकांची झेप घेण्यास मदत झाल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.
प्रमुख कंपन्यांच्या बळावर सेन्सेक्स दिवसअखेर 646.40 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,840.32 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 171.25 अंकांच्या तेजीसोबत 11,449.25 वर स्थिरावला आहे.
सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग सर्वाधिक सात टक्क्मयांनी वधारल्याने कंपनीने बाजारात दुपारी आपल्या व्यवसायासह बाजारमूल्य 14,66,589.53 कोटी रुपये म्हणजे 199.64 अब्ज डॉलरवर नेले आहे. अमेरिकेतील खासगी इक्विटी कंपनी सिल्वर लेक रिलायन्स रिटेलमधील 1.75 टक्क्मयांची हिस्सेदारी 7,500 कोटी रुपयांमध्ये खरेदी करणार असल्याची घोषणा केली आहे. दिवसभरात एकावेळी रिलायन्सचे समभाग 8.45 टक्क्मयांच्या वाढीसोबत 2,343.90 वर पोहोचल्याचे पहावयास मिळाले.
बाजारातील अन्य कंपन्यांमध्ये एशियन पेन्ट्स, ऍक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक आणि बजाज फायनान्सचे समभाग लाभात राहिले आहेत. तर टाटा स्टील, भारती एअरटेल, कोटक बँक, एचडीएफसी बँक आणि टायटनचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. प्रामुख्याने रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचा जोरदार लिलावाचा देशातील शेअर बाजाराला मोठा लाभ झाल्याची नोंद केली आहे. तर जागतिक शेअर बाजारामध्ये प्रामुख्याने आशियातील चीनचा शांघाय कम्पोजिट आणि हाँगहाँगचा हँगसेंग हे नुकसानीत राहिले आहेत. दक्षिण कोरियाचा कोस्पी तसेच जपानचा निक्की हे नफ्यात राहिलेत. जागतिक बेंचमार्क 1.27 टक्क्मयांनी नुकसान होत 40.27 डॉलर प्रति बॅरेल वर आले आहे.