ऑनलाईन टीम / इस्लामिया :
इजिप्तच्या सुएझ कालव्यात मागील पाच दिवसांपासून अडकून पडलेले ‘एव्हर गिव्हन’ हे महाकाय मालवाहू जहाज बाजूला करण्यात आज यश आले. सुएझ कालव्याने आता मोकळा श्वास घेतला असून, पूर्व-पश्चिम हा जागतिक सागरी मार्ग पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
जगतिक व्यापारात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुएझ कालव्यात 23 मार्चला ‘एव्हर गिव्हन’ हे महाकाय मालवाहू जहाज अडकले होते. या जहाजावर पनामाचा ध्वज होता. आशिया ते युरोप दरम्यानच्या मालवाहतूकीसाठी जहाज वापरण्यात येत होते. मंगळवारी आशिया व सिनाई द्विपकल्पातील निमुळत्या भागात हे जहाज अडकून पडले होते. त्यामुळे 156 जहाजांची वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे इजिप्तला मागील पाच दिवसात ताशी 2800 कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले. कारण इजिप्तला टोल टॅक्सच्या रुपाने दररोज 67,200 कोटी रुपये मिळतात.
सुएझ कालव्यात अडकेले हे जहाज हेवी टगबोटच्या सहायाने बाहेर काढण्याची योजना आखण्यात आली होती. जहाजातील कंटेनर बाहेर काढून हे जहाज टगबोटच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. हे जहाज 400 मीटर लांबीचे असून, या जहाजात जवळपास 20 हजार कंटेनर होते. या जहाजाची उंची दहा मजली इमारतीपेक्षा उंच आहे.