ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उर्वरित मंत्रिमंडळाचा शपथविधी आज 84 दिवसानंतर पार पडला. भाजपचे दिगग्ज नेते शाहनवाज हुसेन यांच्यासह जेडीयू आणि भाजपसह अन्य 17 आमदारांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
तीन महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू-भाजपाला बहुमत मिळाले होते. सत्ता स्थापनेवेळी नितीश कुमार यांच्यासोबत मोजक्याच नेत्यांनी शपथ घेतली होती. त्यानंतर आज 84 दिवसानंतर त्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला.
त्यामध्ये शाहनवाज हुसेन, प्रमोद कुमार, सम्राट चौधरी, निरज सिंह, सुभाष सिंह, नितीन नवीन, नारायण प्रसाद, अलोक रंजन झा, जनक राम या भाजपच्या आमदारांनी तर श्रवण कुमार, मदन सहनी, संजय झा, लेसी सिंह, सुनील कुमार, जयंत राज, जमा खान या जेडीयूच्या आणि सुमित कुमार सिंह या अपक्ष आमदाराने पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.