उचगाव : अगसगे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी ग्रामविकास आघाडीच्या चन्नम्मा भरमा तिरमाळे व उपाध्यक्षपदी भैरू जयवंत कंग्राळकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शुक्रवारी ग्रा. पं. कार्यालयात ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. सकाळी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या दोघांचा अर्ज दाखल करण्यात आला. त्यामुळे दोघांचीही बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षपद एसटी महिलासाठी तर उपाध्यक्षपद सामान्य वर्गासाठी राखीव आले होते. निवडीनंतर गावात गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला. अगसगे ग्रा. पं. मध्ये चलवेनट्टी व म्हाळेनट्टी या गावांचाही समावेश असून एकूण 13 सदस्य आहेत. यामध्ये काँग्रेसचे सहाजण निवडून आले आहेत. तर ग्रामविकास आघाडीचे सात जण निवडून आले आहेत.
Previous Articleसांगली : महावितरणच्या विरोधात भाजपचा हल्लाबोल
Next Article होनगा ग्रा. पं. अध्यक्षपदी विजय व्हनमनी यांची निवड
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.