प्रतिनिधी/ सातारा
सातारसह जिल्हयातील नगरपरिषदांच्या हद्दीतील आणि सातारा प्रादेशिक योजनेतील विशेष बांधकामांना, अग्निशमन विभागाचे ना हरकत सध्या मुंबई येथुन मिळत आहे, त्याचा फार मोठा भुर्दंड विशेष बांधकामधारकांना होत आहे. ना हरकत प्रमाणपत्र सातारा येथुन नगरपरिषदेच्या अग्निग्नशमन केंद्र अधिकाऱयांमार्फत किंवा कोल्हापूर येथील मुख्य अग्नग्निशमन अधिकारी यांचे मार्फत प्रदान करण्यास प्राधिकृत करण्यास, किंवा सातारा येथे मुख्य अग्निग्नशमन अधिकाऱयांची नियुक्त करणे यापैकी तातडीने जे शक्य आहे त्याबाबत शासनाने योग्य ते आदेश काढावेत अशी विनंती मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी एका निवदनाव्दारे मंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली आहे.