कोरोना रुग्णांची संख्या वाढत असानाही एसओपीला तिलांजली
प्रतिनिधी / पणजी
अग्निशामक दलाच्या कवायतीवेळी सोशल डिस्टस्निंगचा फज्जा. कोरोना धोका वाढत असतानाही राज्याच्या वेगवेगळ्या अग्निशामक दलाच्या केंद्रातून आलेले जवान मोठय़ा संख्येने पणजीतील अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या मैदानावर जमले आहे. एकाबाजूने कोरोनाचेय संकट वाढत आहे. जनतेने नियमांचे पालन करावे असे सांगण्यात येत असतानाच सरकारी खात्यांचे विविध कार्यक्रम आयोजीत केले जात असून त्या ठिकाणी लोकांची गर्दीही मोठय़ा प्रमाणात होत आहे. मास्क किंवा सरकारने घालून दिलेले इतर कोणतेच नियम पाळले जात नसल्याचे दिसून येत आहे.
गोवा अग्निशामक दलाच्या मुख्यालयात 18 एप्रिल रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या कार्यक्रमानिमित्ताने मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सुमारे 500 स्पर्धक भाग घेणार आहेत. तसेच उत्तर गोवा दक्षिण गोवा अशा दोन ठिकाणी सायक्लोथॉन स्पर्धा आयोजित केली असून त्यातही मोठय़ाप्रमाणात स्पर्धक भाग घेणार आहेत. राज्यात कोरोना महासंकटाने थैमान घालायला सुरुवात केली असताना या सगळ्याच कार्यक्रमांचे आयोजन करणे जरुरीचे आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अग्निशामक दलाचे संचालक अशोक मेनन यांच्या हट्टापायी सर्व नियम धाब्यावर बसवून या कार्यक्रमाचे आयोजन केले जात असल्याचे अग्निशमाक दलातील काही जवानानी सांगितले आहे. 18 रोजी होणाऱया कार्यवक्राला किमान 300 लोकांची उपस्थिती असणार आहे. तसेच राज्यातील विविध अग्निश्माक दलातील 500 जवान परेड करणार आहे. तसेच अग्निशामक दलातील काही जवान कवायतीही सादर करणार आहेत. हे सगळे होत असताना सरकारने घालून दिलेल्या कोरोना बाबतच्या नियमांचे पालन होणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.