नवी दिल्ली
औषध कंपनी अजंता फार्माने 286 कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदीच्या योजनेला कंपनीच्या संचालक मंडळाकडून मंजुरी दिली आहे. यामध्ये कंपनी जास्तीत जास्त 2,550 रुपये प्रति समभाग दराने ही पुनर्खरेदी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये तब्बल 11,20,000 पूर्ण समभागाचा समावेश होण्याचे संकेत आहेत. समभागांच्या पुनर्खरेदीसाठी एकूण 356 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे पेमेंट करण्यात येणार आहे. याकरिता 70 कोटी रुपयाच्या रक्कमेचा समावेश होणार आहे.