तेजस्वी सातपुते यांची सोलापूरला बदली : सातपुतेंच्या बदलीने सातारकर भावूक
एसपी सातपुते फोटो 7 एसएटीए 21 :अजयकुमार बन्सल 7 एसएटीए 19
प्रतिनिधी / सातारा
शासकीय मुदतीनंतर बदली होणे हा अपरिहार्य भाग असतो. मात्र एखादा अधिकारी जनतेला एवढा भावतो त्याची बदली झाल्यानंतर जनता भावूक होते. सातारच्या एसपी तेजस्वी सातपुते यांच्या बदलीनंतर अशाच प्रतिक्रिया उमटल्या. मात्र, त्यांची बदली सोलापूर पोलीस अधीक्षक म्हणून झाली असून त्यांच्या जागी गडाचिरोलीहून अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अजयकुमार बन्सल हे आता सातारा जिल्हय़ाचे एसपी म्हणून रुजू होणार आहेत.
दीड वर्षांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून तेजस्वी सातपुते जिल्हय़ात आल्या. साताऱयाचे राजकारण, समाजकारण पाहता पोलीस अधीक्षक म्हणून त्यांची कारकीर्द कशी राहणार अशी उत्सुकता जनतेला होती. मात्र, तेजस्वी सातपुते यांनी आपल्या वेगळय़ा कार्यशैलीने फक्त नागरिकांच्या मनातच नाही तर पोलीस दलातील सर्वांच्या मनात स्थान मिळवले. त्यांनी धडक कारवाया करत गुन्हेगारीवर वचकही ठेवला. तर चांगले उपक्रम राबवत स्मार्ट पोलिसिंग राबवण्याचाही चांगला प्रयत्न केला. सातपुते यांची कामगिरी जिल्हय़ात तेजस्वीच झाली अशी सर्वांची भावना असून सातपुते दांपत्यांनी माध्यमांशीही चांगला संवाद जपला होता.
सामाजिक शांतता, कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे काम करण्याबरोबरच त्यांनी पोलीस दलातील प्रत्येकाला पोलीस दल आपले कुटुंब वाटावे अशी भावना निर्माण केली. कोरोना कालावधीत देखील त्यांनी जिल्हय़ातील जनतेशी संवाद साधत प्रबोधन व कायदा याची सांगड घालत चांगले काम केले. तर पोलिसांसाठी स्वतंत्र असे राज्यातील पहिले कोविड हॉस्पिटल उभारण्यासाठी योगदान दिल्याने त्यांचा राज्यपातळीवर गौरवही झाला होता.
साताऱयाला लाभणार तरुण एसपी
गडोचिरोलीतील अहिर जिल्हय़ात अपर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या अजयकुमार बन्सल यांचे एसपी म्हणून पहिले पोस्टिंग सातारा जिल्हय़ात होत आहे. त्यांच्यामुळे एसपी म्हणून तरुण अधिकारी जिल्हय़ाला लाभत आहे. पहिल्यापासून अत्यंत हुशार असलेल्या अजयकुमार बन्सल यांनी सलग तीन वेळा आयएएस परीक्षेत यश मिळवले होते. पहिल्या प्रयत्नात 138 वी रँक, 2012 साली परीक्षेत 524 वी रँक मिळवत असिस्टंट कस्टम कमीशन पदावर नियुक्ती तर 2013 च्या परीक्षेत त्यांनी 178 वी रँक मिळवली. त्यानंतर ते महाराष्ट्र केडरमध्ये कार्यरत आहेत. ते आयआयटी सिव्हिल इंजिनियअर असून त्यांच्या घरात सर्वजण उच्चशिक्षित आहेत. त्यांचे वडील मदनलाल बन्सल पदमपूर बार असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. त्यांची आई कांतादेवी उपप्राचार्य पदावर कार्यरत असून भाऊ कुमार बन्सल अंतराळ वैज्ञानिक आहेत. एक बहीण नेत्ररोगतज्ञ असून दुसरी बहीण रीतू गर्ग प्रख्यात व्याख्याता आहे.
एसपींचा फोटो वापरावा : साताऱयातील पहिले पोस्टिंग आनंददायी
एसपी म्हणून सातारा जिल्हय़ात माझे झालेले माझ्या सर्व्हिस करिअरमधील पहिले पोस्टिंग माझ्यासाठी खूप आनंददायी होते. क्रांती, पराक्रमाचा, सुधारणेचा वसा जपणाऱया जिल्हय़ातील हे माझे पोस्टिंग कायम स्मरणात राहील. पोलीस दलातील सर्व अधिकारी, कर्मचाऱयांनी खूप चांगले सहकार्य केले. तर जनतेसाठी काही नवीन उपक्रम राबवू शकले. बदली हा प्रक्रियेचा भाग असतो. सातारा खूप आवडला होता. सपोर्टिंग नेचर खूप अनुभवले.