वृत्तसंस्था/ हैदाबाद
ओडेन्स येथे 13 ऑक्टोबरपासून डेन्मार्क खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय बॅडमिंटनपटू डेन्मार्ककडे रवाना झाले आहेत. मात्र भारताचा पुरुष बॅडमिंटनपटू अजय जयराम याला शुक्रवारी सकाळी ब्रिटिश एअरवेजने आपल्या विमानातून प्रवास करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे तो डेन्मार्कमध्ये वेळेवर पोहोचू शकणार नाही. कदाचित जयरामला ही स्पर्धा हुकण्याची शक्मयता वर्तविली जात आहे.
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनतर्फे सुपर-750 दर्जाची डेन्मार्क खुली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा प्रत्येक वषी भरविली जाते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचे किदाम्बी श्रीकांत, शुभंकर डे आणि लक्ष्य सेन यांनी एअर फ्रान्सच्या विमानाने डेन्मार्ककडे प्रयाण केले आहे. अजय जयराम ब्रिटिश एअरवेजच्या विमानाने डेन्मार्कला जाणार होता. पण कोरोना महामारी समस्येमुळे ब्रिटिश एअरवेजने आपल्या क्वारंटाईन नियमाचे काटेकोर पालन केले आहे. या नियमानुसार ब्रिटिश एअरवेजचे हे विमान लंडनला काही कालावधीसाठी थांबणार आहे. अजय जयरामने यापूर्वीच ब्ा्रिटिश एअरवेजच्या विमानाचे तिकीट आरक्षित केले होते. दरम्यान, आपण विमानतळावर पोहोचलो, पण आपल्याला विमानापर्यंत जाण्यासाठी संबंधित एअरलाईन्सच्या अधिकाऱयांनी नकार दर्शविला. यामुळे मला आता डेन्मार्कमध्ये वेळेवर पोहोचणे अवघड झाल्याचे जयरामने म्हटले आहे. रविवारपर्यंत जयरामने हवाई प्रवासाचे तिकीट निश्चित केले तरच तो डेन्मार्कला वेळेवर पोहोचू शकेल, असे सांगण्यात आले.