नीरज पांडेच्या चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
‘ए वेडनेसडे’, ‘स्पेशल 26’ आणि ‘एमएस धोनी ः द अनटोल्ड स्टोरी’ यासारख्या चित्रपटांसाठी ओळखला जाणारा नीरज पांडे आता एक रोमँटिक चित्रपट घेऊन येतोय. या चित्रपटाचे नाव ‘औरों मे कहां दम था’ असून यात अजय देवगण, तब्बू आणि जिमी शेरगिल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. अजय आणि तब्बूने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
अजय देवगणने नीरज पांडे यांच्या चित्रपटाच्या सेटवरील काही छायाचित्रे शेअर केली आहेत. यात अजय, तब्बू आणि जिमी शेरगिल दिसून येत आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून जिमी शेरगिल दीर्घकाळानंतर मोठय़ा पडद्यावर पुनरागमन करणार आहे.
अजय आणि तब्बूने 1994 मध्ये ‘विजयपथ’, 1995 मध्ये ‘हकीकत’, 1999 मध्ये ‘तक्षक’, 2015 मध्ये ‘दृश्यम’, 2016 मध्ये ‘फितूर’, 2017 मध्ये ‘गोलमाल अगेन’, 2019 मध्ये ‘दे दे प्यार दे’ आणि मग दृश्यम 2’मध्ये एकत्र काम केले आहे. चाहत्यांना या दोघांची ऑनस्क्रीन जोडी अत्यंत पसंत आहे. अजयकडे सध्या ‘भोला’, ‘मैदान’, ‘सिंघम अगेन’ आणि ‘नाम’ हे चित्रपट आहेत. तर तब्बू अलिकडेच ‘कुत्ते’ चित्रपटात दिसून आली होती. तर पुढील काळात ती ‘भोला’ आणि खूफिया’मधून झळकणार आहे.