बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या उत्तम अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘मैदान’ प्रेक्षकांच्या भेटीस सज्ज झाला आहे. या चित्रपटात अजय महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
अजयने ट्विटरवर आगामी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत ‘मैदान, एक अशी कथा जी प्रत्येक भारतीयाला आवडेल, एक असा चित्रपट ज्यासाठी मी खूप उत्सुक आहे. 3 जून 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होईल’ असे अजयने म्हटले आहे.
मैदान या चित्रपटात अजय फुटबॉल प्रशिक्षकाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रियामणी, गजराज राव, रुद्रनील घोष हे कलाकार झळकणार आहेत. अजय देवगणचा हा चित्रपट 15 ऑक्टोबर म्हणजेच दसऱयाच्या दिवशी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोना संकटामुळे या चित्रिकरण पुढे ढकलण्यात आले होते. हा चित्रपट आता 2 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.