ब्रिटिश शो ‘लूथर’च्या रिमेकमध्ये करणार अभिनय
अजय देवगणने अलिकडेच स्वतःचा आगामी चित्रपट ‘गोबर’ची घोषणा केली होती. याचदरम्यान अजर लवकरच स्वतःच्या पुढील प्रकल्पाची वाच्यता करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर अजय लवकरच एंट्री करणार आहे. ब्रिटिश शो ‘लूथर’च्या रिमेकमध्ये तो काम करणार आहे. ‘लूथर’च्या रिमकेला वेबसीरिजमध्ये रुपांतिरत करण्यात येणार आहे. पुढील आठवडय़ात निर्माते या वेबसीरिजची घोषणा करणार आहेत. मार्च महिन्यात अजयने एका सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत संकेत दिला होता. चाहत्यांना अजय देवगणच्या जागी सुदर्शन पाहणे पसंत आहे का नाही अशी विचारणा पोस्टद्वारे केली होती. लूथर एक सायकोलॉजिकल क्राइम थ्रिलर ब्रिटिश शो असून यात इद्रिस एल्बा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. या वेब सीरिजची निर्मिती बीबीसी इंडिया आणि एपलॉज एंटरटेन्मेंट करणार आहेत. चित्रिकरण संपल्यावर ही वेब सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित केली जाणार आहे.