ऑनलाईन टीम / मुंबई :
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कारखान्यांचे संचालक आणि नातेवाईकांच्या घरी आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत 184 कोटींचे बेनामी संशयास्पद व्यवहार समोर आले आहेत. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाने दिलेल्या माहितीच्या आधारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे.
आयकर विभागाने 9 दिवसात अजित पवार यांच्याशी संबंधित मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूर येथील 70 ठिकाणी छापेमारी केली. यामध्ये जरंडेश्वर शुगर, दौड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर तसेच मुंबईच्या दोन रिअल इस्टेट व्यवसाय समूहांवर कारवाई केली. यामध्ये 1000 कोटींची जमीन, सदनिका, ऑफिस, साखर कारखाने, कोटय़वधींची रोख रक्कम आणि ज्वेलरी असल्याचे उघड झाले. त्यामधील 184 कोटी रुपयांचे बेनामी संशयास्पद व्यवहार असल्याचे समोर आले आहे, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.