2011 च्या त्सुनामीत गेली होती वाहून
जपानमधील एक 64 वर्षीय व्यक्ती मागील 10 वर्षांपासून स्वतःच्या पत्नीला समुद्रात शोधत आहे. या व्यक्तीचे नाव आहे यासुओ ताकामात्सु. 2011 मध्ये जपानमध्ये आलेल्या त्सुनामीत त्याची पत्नी बेपत्ता झाली होती. तेव्हापासून यासुआ स्वतःच्या पत्नीला शोधत आहेत.
अंडरवॉटर डायव्हिंग शिकले
यासुओ यांनी स्वतःच्या पत्नीला शोधण्यासाठी अंडरवॉटर डायव्हिंगचा परवानाही मिळविला आहे. मागील 7 वर्षांपासून ते एकटेच अंडरवॉटर डाइव्ह करत आहेत. स्वतःच्या पत्नीशी संबंधित एखादी वस्तू शोधण्यास यश मिळावे म्हणून ते झटत आहेत.
शोधमाहीम सुरूच
जपानचे प्रशासन मागील अनेक वर्षांपासून अडीच हजार लोकांचा शोध घेत आहे. याचमुळे अंडरवॉटर शोधमोहीम सुरू आहे. यासुओ वैयक्तिक स्वरुपात या मोहिमेशी जोडले गेले आहेत. ते स्थानिक प्रशासनाच्या सदैव संपर्कात राहतात. तसेच या शोधमोहिमेत भागही घेतात.
काय-काय मिळाले?
त्यांना आतापर्यंत पाण्यात अनेक कपडे, अल्बम आणि विविध सामग्री मिळाली आहे, पण यातील काहीच त्यांच्या पत्नीचे नाही. सर्व सामग्री अन्य लोकांची आहे. 2011 मध्ये आलेल्या त्सुनामीने मोठे नुकसान घडविले होते. 700 किलोमीटर प्रतितासाच्या वेगाने 133 फूट उंचीयच लाटांनी जपानच्या उत्तरपूर्व किनाऱयाला हादरवून सोडले हेत. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्पालाही नुकसान पोहोचविले होते. युक्रेनच्या चेर्नोबिलनंतर याला सर्वात धोकादायक आण्विक नुकसान मानले जाते. या त्सुनामीत 15 हजारांहून अधिक जण मारले गेले होते. तर 2 लाख 30 हजारांहून अधिक लोकांना स्वतःचा जीव वाचविण्यासाठी घरदार सोडून द्यावे लागले होते.
कशी बुडाली पत्नी?
यासुओ यांची पत्नी काम करणारे ठिकाण डोंगरायच मागे होते. बँकेने धोका वाढत असल्याचे पाहून कर्मचाऱयांना अन्यत्र हलविले होते. पण त्सुनामीची तीव्रता वाढल्याने बँकेचे अनेक कर्मचारी यात वाहून गेले होते. यात यासुओ यांची पत्नीही सामील होती, अद्याप तिचा मृतदेह हाती लागलेला नाही.