प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरातील साळवीस्टॉप परिसरातील जलतरण तलाव येथे दुचाकीच्या धडकेत तरूण जखमी झाल़ा ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडल़ी विनोद जाधव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आह़े अधीक उपचारासाठी त्यानां कोल्हापूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आह़े
मिळालेल्या माहितीनुसार विनोद जाधव हे रत्नागिरी नगर परिषदेचे कर्मचारी आहेत़ रविवारी सायंकाळच्या सुमारास जाधव हे साळवी स्टॉप येथून जात होत़े जलतरण तलाव येथे अज्ञात दुचाकीस्वाराने त्याना जोरदार धडक दिल़ी यामध्ये जाधव हे जखमी झाल़े यावेळी अज्ञात दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढल़ा जखमी अवस्थेत पडलेल्या जाधव यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होत़े मात्र त्यांना गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात आल्याची माहिती समोर आली आह़े