कुंभोज / वार्ताहर
हातकणंगले तालुक्यातील दुर्गेवाडी येथे वहसात नंबर २ मधील लक्ष्मण निवृत्ती पाटील यांच्या राहत्या घरी लोखंडी जाळीचे कंपाऊंड तोडून अज्ञात प्राण्यांच्या हल्ल्यात शेळीच्या दोन पिल्लांचा बळी गेला आहे.
हा हल्ला नेमका कोणत्या प्राण्याने केला याची माहिती अद्याप मिळाली नाही. तर झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? हा प्रश्न अद्याप अनोत्तरीच आहे. त्यामुळे यावेळी उपस्थित सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी या शेतकऱ्यास नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.