पुणे-बेंगळूर मार्गावर भुतरामहट्टीजवळ घडली दुर्घटना
प्रतिनिधी/ बेळगाव
अज्ञात वाहनाच्या ठोकरीने मोटारसायकलवरील दोन तरुण जागीच ठार झाले. सदर घटना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील भुतरामहट्टीजवळ शनिवारी रात्री 9 वाजता घडली. बसवराज लगमप्पा डुमनाईक (वय 23) व दुर्गाप्पा कऱयाप्पा गुंडय़ागोळ (वय 24) दोघेही राहणार राजनकट्टी ता. हुक्केरी अशी अपघातातील मयत युवकांची नावे आहेत.
बसवराज व दुर्गाप्पा हे दोघे गवंडी काम करत होते. काम संपवून मोटारसायकलवरून आपल्या गावाकडे जाताना ही घटना घडली आहे. घटनेची माहिती समजताच काकतीचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र हळ्ळूर व पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मोटारसायकलला ट्रकने ठोकरल्याचा संशय असून अपघातानंतर वाहन चालकाने वाहनासह पलायन केले आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.