शिरोळ प्रतिनिधी
रात्री शेतामध्ये पाणी पाजत असताना साप , बिबट्या, गवा, अस्वल, रानडुक्कर अशासारख्या जंगली प्राणी आढळल्यास त्यांना इजा न करता त्यांना ताब्यात घेऊन आणि जिल्ह्याच्या व तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सरकारी कार्यालयात आणून सोडावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केल्यानंतर शिरोळ तालुक्यातील अज्ञात शेतकऱ्यांनी शिरोळ तहसील कार्यालय तसेच साप सोडल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
जंगली प्राण्यांची जोपासणा व संवर्धन करणे ही संपुर्ण जबाबदारी सरकारची आहे. यामुळे हे प्राणी जर चुकून आपल्या शेतात आले तर त्यांना त्यांच्या सरक्षणार्थ सरकारी कार्यालयात सोडणे आपली जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी पार पडण्यासाठी शेतकऱ्यांनी साप पकडून जिल्हाधिकारी यांचेकडे सुपुर्द केले होते. ही घटना ताजी असतानाच शिरोळ तालुक्यातील तहसिल कार्यालयाच्या गेटमध्ये अज्ञात शेतकऱ्यांनी साप सोडल्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे स्वभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.,,,