रोम
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या इटालियन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत बेलारूसची व्हिक्टोरिया अझारेन्का तसेच स्पेनची मुगुरूझा यांनी एकेरीची तिसरी फेरी गाठली.
या स्पर्धेत गुरूवारी महिला एकेरीच्या दुसऱया फेरीतील सामन्यात बेलारूसच्या अझारेन्काने तृतीय मानांकित सोफीया केनीनचा 6-0, 6-0 अशा सरळ सेट्समध्य्sा एकतर्फी पराभव केला. गेल्या शनिवारी झालेल्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत उपविजेपद मिळविणाऱया अझारेन्काने रोमच्या स्पर्धेत अमेरिकेच्या अनुभवी व्हिनस विलियम्सचा पराभव केला होता. येथे मात्र केनिनचा तिने एकतर्फी धुव्वा उडविला. दुसऱया एका सामन्यात स्पेनची माजी प्रेंच ग्रॅन्डस्लॅम विजेती मुगुरूझाने अमेरिकेच्या कोको गॉफचे आव्हान 7-6 (7-3), 3-6, 6-3 असे संपुष्टात आणत शेवटच्या 16 खेळाडूत स्थान मिळविले.