ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा केल्याच्या संशयावरुन ब्रूक फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना ताब्यात घेतल्याचे कळताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस स्थानकात धाव घेतली होती. यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांना अटक करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली होती. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी चाकणकरांना खडेबोल सुनावले आहे.
उठले की निघाले आरोप करायला, आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीसांना अटक करा. अटक मटक चवळी चटक वाटले की काय?, असा टोला चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकरांना लगावला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलेे आहे.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणल्या की, उठले कि निघाले आरोप करायला आता काय तर म्हणे देवेंद्र फडणवीस यांना अटक करा अटक मटक चवळी चटक वाटलं कि काय?#Remdesivir राज्यसरकारलाचं देणार होते संबंधीत मंत्र्यांशी CS साहेबांशी बोलणे झालेले…माहिती तर घ्यायची आधी सरकार म्हणतं सहकार्य करा आम्ही करत आहोत व करणारचं पण या बावळटांना आवरा रे, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी टीका केली आहे.
कंपनीच्या लोकांना मंत्र्याचा OSD फोनकरून दम देतो? मंत्र्याच्या OSD ची काय एवढी हिंमत की तो कंपनीच्या लोकांना फोनवरून धमकी देईल की सरकारला यातूनही आधी वसूली करायची होती याबाबत चकार शब्द ही सत्ताधाऱ्यांकडून आला नाही. तसेच एकाबाजूला राजकारण करू नका हे विरोधी पक्षाला सांगायचे आणि दुसरीकडे आपले अपयश लपवण्यासाठी कांगावा करायचा, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.