सरकारी नियमांकडे बोट दाखवत नकारघंटा
प्रतिनिधी बेळगाव
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडपाऐवजी मंदिरात मूर्ती प्रति÷ापनेची अट शिथिल करण्यासाठी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱयांनी जिल्हाधिकाऱयांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र, सरकारी नियमांकडे बोट दाखवत या नियमात बदल होणार नाही, अशी भूमिका जिल्हाधिकाऱयांनी घेतली आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ व पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली. रणजित चव्हाण-पाटील, नेताजी जाधव, मालोजी अष्टेकर आदींसह काही प्रमुख पदाधिकाऱयांनी सार्वजनिक गणेशोत्सवासाठीचे काही नियम शिथिल करण्याची मागणी केली.
सर्वच गल्ल्यांत मंदिरे नाहीत. त्यामुळे अशा मंडळांनी कोठे श्रीमूर्तीची स्थापना करायची? हा मोठा प्रश्न आहे. म्हणून किमान लहान मंडप उभारण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मंदिरे नसतील तर मंगल कार्यालये किंवा मोठय़ा इमारतीत श्रीमूर्तींची प्रति÷ापना करा, त्यासाठीची परवानगी देऊ, असे अधिकाऱयांनी सांगितले.