स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : दुचाकी, मारुती कार जप्त :
प्रतिनिधी/ सातारा
सातारा, कोल्हापूर, सांगली, शिर्डी, राहुरी, बारामती या ठिकाणी दुचाकी, चारचाकी गाडय़ा चोरणारा अट्टल चोरटा जेरबंद करण्यात सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या चोरटय़ाने महिन्यापूर्वी त्याला जामीन मिळवून देणाऱया वकिलाची दुचाकीही चोरुन नेली होती. त्याच्याकडून दुचाकी, मारुती कार असा एकूण 95 हजार रुपये किंमतीच्या चोरीतील गाडय़ा हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशाल पोपट काळे (वय 24 रा. काळोशी, ता. सातारा, मूळ रा. कोळगाव, जि. अहमदनगर) असे केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे.
याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी दिलेली माहिती अशी, दुचाकी चोऱयांचे प्रमाण वाढल्याने हे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना एसपी तेजस्वी सातपुते व अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी केल्या होत्या. पोलीस निरीक्षक पाटील यांना काळोशी, कोडोली (ता. सातारा) गावाकडे जाणारे रोडच्या कडेला चोरीची मारुती 800 व स्प्लेंन्डर मोटार सायकल लावली असल्याची माहिती मिळाली.
त्यांनी तपास पथकास तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या त्याअनुशंगाने पोलीस पथकाने काळोशी येथे सापळा रचला होता. यावेळी संशयित इसम हा स्प्लेंन्डर मोटार सायकलजवळ ती घेऊन जाण्याच्या तयारीत असताना त्यास पोलीस पथकाच्या सहाय्याने ताब्यात घेतले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने स्प्लेन्डर मोटार सायकल क्रमांक एम. एच. 11 सी. सी. 8016 व मारुती 800 गाडी क्र. एम. एच. 01 व्ही. 4514 ही चोरुन आणली असल्याचे सांगितले. तसेच त्याने उंब्रज पोलीस स्टेशनला गुह्यात खोटे नाव सांगून वकिलाकरवी जामीन केला व त्याच वकिलांची गाडी पैसे घेवुन येतो, चोरुन नेल्याचे कबूल केले आहे. त्याने सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हय़ांची कबुली दिली आहे. त्याच्यावर यापुर्वी सातारा, कोल्हापुर, सांगली, शिर्डी, राहुरी, बारामती, येथे मोटार सायकल व चार चाकी गाडय़ा चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे, सहाय्यक फौजदार ज्योतीराम बर्गे, हवालदार सुधीर बनकर, विनोद गायकवाड, पोलीस नाईक संतोष जाधव, मोहन नाचण, गणेश कापरे, वैभव सावंत, धीरज महाडीक यांनी सहभाग घेतला.