नवी दिल्ली / वृत्तसंस्था
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून यांना युक्रेनमधूनही एअरलिफ्ट करण्याचे नियोजन केले आहे. तसेच काही जणांना पोलंडमार्गे बाहेर काढण्याचा निर्णय घेतला आहे. दुतावासाने विद्यार्थ्यांना पासपोर्ट आणि कोविड-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र सोबत ठेवण्यास सांगितले आहे. तसेच वाहनांतून प्रवास करताना गाडीवर भारतीय तिरंगा लावण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. युपेनमध्ये अडकलेल्यांसाठी भारताने हेल्पलाईन क्रमांकही जारी केला आहे. रशियाने युपेनवर केलेल्या हल्ल्यानंतर वेगवेगळय़ा शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी एअर इंडियाची दोन उड्डाणे सज्ज ठेवली आहेत. ही विमाने शुक्रवारी रात्री रवाना होऊन बुखारेस्ट, रोमानिया मार्गे भारतीयांना घेऊन माघारी येतील. या विमानसेवेचा खर्च भारत सरकार उचलणार आहे.