युक्रेनमध्ये हजारो भारतीय नागरिक युद्धामुळे अडकून पडले असून त्यांना अन्न, पाणी व औषधे यांचा तुटवडा जाणवू लागला आहे. युद्ध ऐन भडकलेल्या अवस्थेत असल्याने त्यांच्यापर्यंत साहाय्य पोहचविणे कोणत्याही संस्थेला अशक्मय झालेले आहे. आतापर्यंत 17 हजाराहून अधिक भारतीयांना युपेनमधून सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे तरी अद्यापही 3 ते 4 हजार नागरिक साहाय्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशावेळी युक्रेन पासून नजीक असणाऱया म्युनिक शहरात राहणारे राजदीपसिंह हरगोत्रा हे छत्तीसगडचे नागरिक साहाय्यासाठी पुढे धावले आहेत.
म्युनिक शहर जर्मनीत आहे. युक्रेनची सीमारेषा युपेनच्याजवळ आहे. राजदीपसिंह हरगोत्रा यांनी युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना अत्यावश्यक औषधे आणि अन्नपुरवठा करण्याचे उत्तरदायित्व स्वतःवर घेतले आहे. राजदीपसिंह हे जम्परोपचे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यांनी आपल्या सवंगडय़ांचा एक गट बनविला असून जर्मनीहून दोन मोठय़ा कारगाडय़ा घेऊन ते प्रतिदिन युक्रेनमध्ये येतात. या गाडय़ांमधून त्यांनी अन्नाची पाकिटे आणि नेहमी लागणारी काही औषधे आणलेली असतात. या अन्न व औषधांचे वाटप युपेनमधील गरजवंत भारतीयांना केले जाते. यामुळे अनेक भारतीयांचे जीवन तशा परिस्थितीतही काही अंशी सुकर झाले आहे. राजदीपसिंह यांच्या या कार्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत असून त्यांना आता आणखी सहकारी मिळाले आहेत. केवळ औषधे व अन्नच नव्हे तर फळांचा रस, पिण्याचे पाणी, झोपण्यासाठी जाजमे, चादरी व लोकरी कपडे इत्यादी साधनेही ते पुरवतात. ही सेवा ते विनामूल्य देत आहेत. यामुळे भूक भागण्याबरोबरच थंडीपासूनही संरक्षण मिळत आहे. राजदीपसिंह यांना आर्ट ऑफ लिव्हिंग, काही गुरुद्वारा आणि जर्मनीतील सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात येते.
त्यांनी एक हेल्पलाईनही सुरू केली असून त्यांना दररोज 200 हून अधिक कॉल येतात. केवळ भारतीयच नव्हे तर हंगेरी आणि जर्मनीतील नागरिकांनाही ते साहाय्य करतात. प्रत्यक्ष युद्धमान भागामध्ये जाऊनही ते ही साधने पुरवतात. यामध्ये मोठा धोका असला तरी सामाजिक कार्य म्हणून आपण हे उत्तरदायित्व स्वीकारले आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. अवघ्या दोन दिवसात त्यांनी 1250 किलोमीटरचा प्रवास करून हे साहाय्यता कार्य केले आहे.