नॉर्थ साऊंड : ऍटीग्वा येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात लंकेचा सलामीचा फलंदाज दनुष्का गुणतिलकेला क्षेत्ररक्षणात अडथळा आणल्याने पंचांनी त्याला बाद ठरविले. बुधवारी लंका आणि विंडीज यांच्यात पहिला वनडे सामना येथील सर व्हिव्हियन रिचर्डस् स्टेडियमवर खेळविला गेला. हा सामना विंडीजने 8 गडय़ांनी जिंकला. या सामन्यात लंकेचा सलामीचा फलंदाज गुणतिलकाने केरॉन पोलार्डच्या षटकांत एकेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला. डावातील हे 22 वे षटक होते. पोलार्डकडे जाणारा चेंडू गुणतिलकेने हेतुपूर्वक अडवून अडथळा आणल्यावर विंडीजने अपील केले होते. तिसऱया पंचांनी रिप्ले पाहून गुणतिलके बाद असल्याचा निर्णय दिला.
संक्षिप्त धावफलक : लंका 49 षटकांत सर्व बाद 232 (गुणतिलके 55, करुणारत्ने 52, बंदारा 50), विंडीज 47 षटकांत 2 बाद 236 (शाय होप 110, ब्रॅव्हो नाबाद 37).