सोमवारी 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह : शिक्षकांची तपासणी अंतिम टप्प्यावर
प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या 24 तासांत जिल्हय़ातील 2,684 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून सोमवारी आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये बेळगाव तालुक्मयातील 8 जणांचा समावेश आहे. बेळगाव तालुक्मयातील शिक्षकांची स्वॅब तपासणी अंतिम टप्प्यात आली आहे.
निर्मलनगर, भाग्यनगर, अनगोळ, क्लब रोड, वडगाव, रामदेव गल्ली परिसरात सोमवारी पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागातील वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी व अनुदानित शाळांतील साडेचार हजारांहून अधिक शिक्षकांची स्वॅब तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 559 अहवाल उपलब्ध झाले आहेत. वेगवेगळय़ा माध्यमिक शाळांतील 8 शिक्षकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
बेळगाव शहर व तालुक्मयातील सहा हजारांहून अधिक शिक्षकांची स्वॅब तपासणी करण्यात येणार आहे. त्यापैकी साडेपाच हजार जणांची तपासणी पूर्ण झाल्याची माहिती मिळाली आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 26,315 इतकी झाली असून यापैकी 25796 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या 177 सक्रिय रुग्ण आहेत. अद्याप 8,993 जणांचे अहवाल यायचे आहे.