सारा अली खानने केला खुलासा
अलिकडेच झळकलेला सारा अली खानचा चित्रपट ‘अतरंगी रे’मधीव तिची व्यक्तिरेखा अत्यंत चर्चेत आहे. साराच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. माझे आईवडिल अमृता सिंह आणि सैफ अली खान हे दोघेही हा चित्रपट पाहिल्यावर भावुक झाले होते. जेव्हा स्वतःच्या आईवडिलांना आपल्याबद्दल गर्व वाटतो, तेव्हा सर्वकाही मिळविल्याची भावना मनाला स्पर्श करून जात असल्याचे साराने म्हटले आहे.
माझा भाऊ इब्राहिम आणि मी परस्परांची थट्टा करत असतो. कॉलेजपासून आतापर्यंत मी त्याची गोलू मोलू बहिण आहे. परंतु त्याला माझ्याबद्दल गर्व असल्याचेही तो म्हणतो, यामुळे मला मोठा आनंद होत असल्याचे विधान साराने केले आहे.
अतरंगी रे चित्रपटात साराने रिंकू नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. या त्रिकोणी प्रेमकथेत सारासोबत अक्षय कुमार आणि दक्षिणेतील दिग्गज अभिनेता धनुषने महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आनंद एल राय यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार यांनी केली आहे.