विधानसभेत माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. शून्य तासात अतिथी प्राध्यापकांच्या आंदोलनाकडे सिद्धरामय्या यांनी सरकारचे लक्ष वेधले.
राज्यातील 430 प्रथम दर्जा कॉलेजमध्ये 14 हजार अतिथी प्राध्यापक काम करतात. यापैकी अनेक जणांनी पीएचडी केली आहे. कॉलेज चालते, तेव्हा या प्राध्यापकांना वेतन मिळते. कॉलेज बंद असताना त्यांना वेतन दिले जात नाही. त्यामुळे संघटनेने अधिवेशनादरम्यान आंदोलन सुरू केले आहे.
एकतर 12 महिने पगार द्या नाहीतर सेवेत कायम करा, अशी मागणी या संघटनेने केली आहे. आपल्याकडेही अशा आशयाची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली आहे. दिल्ली सरकारने 16 हजार अतिथी प्राध्यापकांना सेवेत कायम केले आहे. कर्नाटकातही अनेकजण निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत. काही जणांनी आत्महत्या केली आहे. आता तर सेमिस्टर पुरताच त्यांना वेतन दिले जात आहे. ही पद्धत चुकीची आहे. त्यांना सेवेत कायम करण्यात यावे, अशी मागणी सिद्धरामय्या यांनी केली.
प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी समिती स्थापन
अतिथी प्राध्यापकांना व्यवस्थित वेतन मिळत नाही. अनेकजण कॉलेजबाहेर कॅन्टीन चालवितात. प्राध्यापकांवर ही वेळ यावी, हे चुकीचे आहे, असे निजदचे आमदार लिंगेश यांनी सांगितले. उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वत्थनारायण यांनी सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्र्यांनी अतिथी प्राध्यापकांच्या समस्या सोडविण्यासाठी 15 डिसेंबर रोजी एक समिती स्थापन केली आहे. कुमार नायक, वेंकटेश नायक, जाफर आदी वरि÷ अधिकारी या समितीत आहेत. येत्या एक महिन्यात समिती अहवाल देणार आहे. त्यानंतर अतिथी प्राध्यापकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यात येणार आहे, असे सांगितले.