मालवण / प्रतिनिधी –
लक्ष्मी नारायण गावडे(हिवाळे-मालवण) या रुग्णाला रक्ताची गरज होती. रुग्णाची रक्त तपासणी केली असता रक्तचाचणी मध्ये रुग्णाचे रक्त ओ पोजीटीव्ह किंवा ओ निगेटिव्ह सुद्धा आढळत नव्हते. नंतर रक्तपेढीचे तंत्रज्ञ श्री.सुमित मुकादम यानी सदरच्या रक्तनमुन्याची सखोल तपासणी केली असता ही रुग्ण बॉम्बे रक्तगटाची असल्याचे निदर्शनास आले. बॉम्बे ब्लड ग्रुप हा अतिदुर्मिळ रक्तगट असुन या रक्तगटाचे दहा लाखांमध्ये ४ रक्तदाते सापडतात.
मालवणचे सुपुत्र तथा बॉम्बे ब्लडग्रुपचे रक्तदाते पंकज संतोष गावडे यांना संपर्क केला. तातडीने पंकज गावडे हे हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रक्ताच्या अत्यावश्यक तपासण्या झाल्यानंतर गावडे यांनी अमूल्य आणि सर्वात दुर्मीळ असे रक्तदान केले. त्यानंतर सदर रुग्णाची अन त्याच्या नातेवाईकांची प्रत्यक्ष भेट घेवुन धीर दिला.