सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी:
सिंधुदुर्गचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी गैर कारभारामुळे त्यांना हटवण्याचा मागणीसाठी आणि गॅस व पेट्रोल दरवाढी विरोधात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांना निवेदन देण्यात आले
मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली सिडको भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी मनसे कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद गावडे,दया मेस्त्री,आपा मांजरेकर, दीपक गावडे आदीसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते उपस्थित होते