अमरकुमार पांडे बेळगाव दौऱयावर
प्रतिनिधी / बेळगाव
कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे बुधवारी बेळगाव दौऱयावर आले आहेत. आपल्या या बेळगाव दौऱयात त्यांनी कोरोना थोपविण्यासाठी पोलीस दलाकडून केल्या जाणाऱया उपाययोजना, पोलिसांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांचा आढावा घेतला.
बुधवारी सकाळी अमरकुमार पांडे यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांना सलामी देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर, गुन्हे तपास विभागाच्या पोलीस उपायुक्त यशोदा वंटगोडी आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.