वार्ताहर /परळी :
परळी खोरे हे अतिवृष्टीचे ठिकाण या भागात इतर ठिकाणांच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्याचबरोबर हिरवाईने नटलेले डोंगर आणि फेसाळणारे धबधबे यांसारखे या भागात पाहायला मिळतात परंतु पावसाच्या जोरदार वायामुळे काही ठिकाणी रस्ता खचणे डोंगराचा काही भाग पडणे यांसारख्या घटना नित्याच्याच म्हणावे लागतील.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे सज्जनगड डोंगरावरील कळकाची बेटे कोसळली असून त्याच बरोबर मातीचा अन दगडांचा भराव हा पडला आहे. सुमारे 50 फूट डोंगरा चा भाग कोसळला आहे.सज्जनगडा वर अशी धोकादायक कडे,दरड कोसळणे सारखी स्थिति निर्माण झाली आहे. तसेच भागात इतरही ठिकाणी रस्ता खचणे दरडी पडण्याचे सत्र जणू सुरूच आहे.