दोषींवर कडक कारवाई करण्याचे दिले आदेश
नवारस्ता / प्रतिनिधी
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील घडलेल्या सातवर्षीय चिमुरडीच्या अत्याचार घटनेची माहिती मिळताच आपले सर्व नियोजित दाौरे रद्द करून राज्याचे गृहराज्यमंत्री ना शंभुराज देसाई यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. दरम्यान या घटनेची कसून चौकशी करून दोषींवर पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले.
पीडित बालिका ही सात वर्षीय बालिका असून ती इयत्ता दुसरीच्या वर्गात शिकत होती. बुधवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ती बाहेर खेळायला गेली मात्र उशिरापर्यंत घराकडे परतली नाही. गिरणीतून दळण घेवून घराकडे आलेल्या आजीच्या लक्षात हा प्रकार आल्यावर शोधाशोध करण्यात आली मात्र ठावठिकाणा न लागल्याने पोलिसांना कळविण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून कसून तपास सुरू केला असून संतोष चंद्रु थोरात याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयिताने बलात्कार करून तिचा गळा आवळून खून केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.