वार्ताहर / कुडाळ:
जिल्हाधिकारी कार्यालयात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी एस. टी. प्रशासनाला बसेस सुरू करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
त्यानुसार सिंधुदुर्ग एस. टी. प्रशासन 7 एप्रिलपासून कणकवली, कुडाळ व सावंतवाडी स्थानकावरुन बसेस प्रायोगिक तत्वावर सोडणार आहे. ही सेवा फक्त जिल्हा मुख्यालयात काम करणाऱया कर्मचाऱयांसाठी आहे. आपले ओळखपत्र दाखवून या बसमधून प्रवास करावा लागेल. मुख्यालयाकडे जाण्यासाठी सावंतवाडीतून सकाळी 9 वाजता, तर कुडाळ व कणकवलीतून 9.15 वाजता बस सुटेल. परतीसाठी मुख्यालयातून सायंकाळी 6.30 वाजता बस सुटेल. यामुळे विशेषत: ज्यांच्याकडे स्वत:ची वाहन सुविधा नाही. तसेच महिला कर्मचाऱयांना याचा फायदा होणार आहे.