प्रतिनिधी/ अथणी
येथील केएलई संस्था संचालित एसएसएमएस बीबीए महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात आली. याचा बीबीए, बीसीए, बीएड्, बीए, बीकॉम, बीएससी आदी विभागाच्या सुमारे 300 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. ही लसीकरण मोहीम अथणी सरकारी रुग्णालयाच्यावतीने तालुका आरोग्याधिकारी डॉ. बसवराज कागे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
यावेळी सरकारी रुग्णालयाचे परिचारक रमेश मांग, परिचारिका राजश्री जीरग्याळ, बीबीए महाविद्यालयाचे प्राचार्य राजशेखर शिंदे, प्राचार्य आर. जी. वंटगुडे, तालुका महाविद्यालय लसीकरणाचे नोडल अधिकारी डॉ. हणगूर, प्रा. रश्मी शिंदे, रवी नंदीमठ, श्रेयस संगणकावर, अनिल वालीकर, शिल्पा गदग, प्रभू खिचडी, प्रवीण पाटील, रम्या जोशी, त्रिवेणी जाधव, मंजुनाथ भोजन्नवर यांच्यासह विद्यार्थी, कर्मचारी आदी उपस्थित होते.