एसीबीची कारवाई, तीन जिल्हय़ातील अधिकाऱयांचा सहभाग
प्रतिनिधी /बेळगाव
सर्वसामान्य नागरिकांकडून आलेल्या वाढत्या तक्रारींची दखल घेत एसीबीच्या अधिकाऱयांनी शुक्रवारी सायंकाळी अथणी येथील उपनोंदणी कार्यालयावर छापा टाकला. याबरोबरच कार्यालय परिसरात असलेल्या बॉण्ड रायटरांची तपासणी केली. तीन जिल्हय़ातील एसीबीचे अधिकारी या कारवाईत सहभागी झाले होते.
एसीबीचे प्रमुख बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक करुणाकर शेट्टी, विजापूरचे पोलीस उपअधीक्षक एम. के. गंगल, पोलीस निरीक्षक ए. एस. गुदीगोप्प, विरण्णा हळ्ळी, सुनीलकुमार, विजय मठपती, समीर मुल्ला, परमेश्वर कवटगी आदींसह बेळगाव, विजापूर, बागलकोट जिल्हय़ातील 30 हून अधिक एसीबीच्या अधिकाऱयांनी या कारवाईत भाग घेतला.
शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अथणी येथील 11 ठिकाणी तपासणी सुरू होती. उपलब्ध माहितीनुसार अथणी येथील उपनोंदणी कार्यालयात कमिशन शिवाय कुठलीच कामे होत नाहीत, अशा आशयाच्या तक्रारी एसीबीकडे आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत पोलिसांनी शुक्रवारी तपासणीसाठी छापे टाकले आहेत.
बॉण्ड रायटरना कमिशन दिले तर उपनोंदणी कार्यालयातील कामे होतात. न हून कसलीच कामे होत नाहीत, अशा तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळेच आपण तपासणीसाठी छापे टाकल्याचे एसीबीच्या अधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले. तपासणी सुरू आहे, अद्याप काही हाती लागले नाही, असेही वरिष्ट अधिकाऱयांनी सांगितले.
एसीबीच्या कारवाईमुळे उपनोंदणी खात्यातील अधिकाऱयांचे धाबे दणाणले आहेत. तीन जिल्हय़ातील अधिकारी व पोलिसांना एकत्रित करून केलेली ही मोठी कारवाई आहे. मात्र या तपासणीत नेमके काय आढळून आले, याचा उलगडा झाला नाही. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.