शुक्रवारी आणखी 15 अहवाल पॉझिटिव्ह, बिम्समधील डॉक्टर तरुणीचा समावेश
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना महामारीमुळे रुग्ण दगावण्याची मालिका सुरुच आहे. गुरुवारी अथणी व हुक्केरी येथील दोन महिलांचा कोरोनामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील मृतांचा आकडा दहावर पोहोचला आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलमधील एक डॉक्टर महिलेसह शुक्रवारी आणखी 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
बुधवार दि. 8 जुलै रोजी हुक्केरी येथील एका 58 वषीय महिलेला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर त्याच दिवशी अथणी येथील एका 65 वषीय वृद्धेला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी या दोन्ही महिलांचा मृत्यू झाला आहे. स्वॅब तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
शुक्रवारी बेळगाव शहर व तालुक्मयातील सहा जणांसह एकूण 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सदाशिवनगर येथील 23 वषीय महिला, हिंदवाडी येथील 60 वषीय वृद्ध, खासबाग येथील एक वषीय बालिका, येळेबैल येथील 55 वषीय रहिवासी, बसवानकुडची येथील 32 वषीय युवक, बेळगाव येथील 55 वषीय रहिवासी असे शहर व तालुक्मयातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
तर मल्लापूर येथील 29 वषीय महिला, 14 वषीय मुलगी, हुक्केरी येथील 58 वषीय महिला, आडी येथील 23 वषीय महिला, सौंदलगा येथील 24 वषीय महिला, जैनवाडी येथील 27 वषीय महिला, अथणी येथील 35 वषीय युवक, ऐनापूर येथील 39 वषीय युवक व बोचवाड (ता. रामदुर्ग) येथील 63 वषीय वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या सर्व 15 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 459 वर पोहोचली असून यापैकी 346 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 112 जणांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. वैद्यकीय विभागात जागा अपुरी पडल्यामुळे दोन दिवसांपासून सर्जिकल ब्लॉकमध्ये रुग्णांना हलविण्यात येत आहे.
प्रशासनाला आणखी 806 अहवालांची प्रतीक्षा आहे. तर जिल्हय़ातील 5 हजार 530 जणांना 14 दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा बजाविणाऱया 23 वषीय डॉक्टर तरुणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सिव्हिलमध्ये एकच खळबळ माजली आहे.
गेल्या 24 तासांत 1101 जणांचे अहवाल निगेटिव्ह
गेल्या 24 तासांत 1 हजार 101 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा सर्वेक्षण विभागाने दिली आहे. गुरुवारच्या माहितीनुसार 1 हजार 907 अहवाल यायचे होते. यापैकी 1101 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर आणखी 806 जणांचे अहवाल यायचे आहेत. आयसीएमआर व बिम्स या दोन ठिकाणी स्वॅब तपासणी सुरू आहे. त्यामुळे तपासणीला वेग आला आहे.
मृतांचा आकडा वाढण्याचा धोका
कोरोना रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे. राज्य आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिनमधील माहितीनुसार बेळगावात सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 9 जणांना आयसीयुमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान गुरुवारीही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा अहवाल यायचा आहे.