पणजी /प्रतिनिधी
तृणमूल काँग्रेसच्या सरचिटणीस अथँल लोबो यांनी गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सरचिटणीस पदाचा राजीनामा पक्षाकडे सादर केला नुकत्याच झालेल्या निवणुकीत त्यांनी फतोरडा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसतर्फे निवडणूक लढवीली होती त्यांच्या राजीनाम्याचे कारण विचारले असता आपण वैयक्तिक कारणास्तव हा राजीनामा देत आहे असे त्या म्हणाल्या गेल्या चार दिवसांपूर्वी विजय पै या आणखी एका महत्त्वाच्या पदाधिकाऱयाने राजीनामा सादर केला होता.