जगातील सर्वाधिक 10 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गौतम अदानी
ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुकेश अंबानी (mukesh ambani) हे जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक आहेत. तसेच ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणूनही ओळखले जात होते. आता त्यात आणखी एका भारतीय व्यक्तीची भर पडली आहे. त्या व्यक्तीने श्रीमंतीत मुकेश अंबानी आणि मार्क झुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनाही मग टाकलं आहे.
आतापर्यंत आपण मुकेश अंबानी यांचं नाव आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या यादीमध्ये पाहिलं होतं. मात्र, आता अंबानींनाही एका भारतीय उद्योजकाने मागे टाकलंय. गौतम अदानी (gautam adani) असं या उद्योजकाचे नाव असून त्यांनी अंबानींना पिछाडीवर टाकून आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. इतकंच नव्हे तर जगातील सर्वाधिक 10 श्रीमंत लोकांच्या यादीमध्ये गौतम अदानींचं नाव आलं आहे. त्यांनी मार्क झुकरबर्गलाही मागे टाकलं आहे.
ब्लूमबर्ग बिलियनायर्स इंडेक्सच्या लेटेस्ट (Bloomberg Billionaires Index) ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. अदानी समुहाचे मुख्य गौतम अदानींची एकूण संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या पार गेली आहे. यासोबतच ते आता सेंटीबिलियनायरच्या लिस्टमध्ये सामील झाले आहेत. सेंटीबिलियनायर त्या लोकांना म्हटलं जातं ज्यांची संपत्ती 100 अब्ज डॉलरच्या वर गेली आहे. या आकडेवारीसह आता अदानी एलॉन मस्क आणि जेफ बेजोसच्या गटामध्ये सामील झाले आहेत.