नवी दिल्ली
अदानी एंटरप्राईझेस लिमिटेडला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात एनएचएआयकडून महामार्ग विकासाचे कंत्राट मिळाले आहे. केरळात होणाऱया महामार्ग विकासाचे 1838 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यात कंपनीने यश मिळवले आहे. भारतमाला परियोजना या योजनेअंतर्गत हा प्रकल्प अदानी एंटरप्राईझेस राबवणार आहे. सदरच्या महामार्गावरील 40 किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अदानी कंपनी हाती घेणार आहे. सदरच्या प्रकल्पासाठी अदानी यांनी अर्ज केला होता. अखेर त्याला मंजुरी मिळाली असल्याची माहिती शेअर बाजाराला कंपनीने दिली.