वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी टोटल गॅस लिमिटेड आगामी काळात अहमदाबाद येथे आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) चार्जिंग स्टेशन सुरु करण्यासोबत इलेक्ट्रिक मोबिलिटीची योजना आखणार आहे. याकरीता अदानी समूह आणि फ्रान्सची ऊर्जा कंपनी टोटलएनर्जी एसइ संयुक्तपणे कामगिरी करणार आहेत. जवळपास 1500 इतक्या नवीन चार्जिंग पेंद्रांची निर्मिती येत्या काळात करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
अदानी टोटल यांनी दिलेल्या माहितीनुसार चार्जिंग स्टेशन अहमदाबादमधील मणिनगरमधील एटीजीएलच्या सीएनजी स्टेशनवर सुरु केले आहे. कंपनीनुसार ईव्ही चार्जिंग स्टेशनअंतर्गत इलेक्ट्रिक वाहन मालकांना आपल्या श्रेणीमधील सर्वश्रेष्ठ चार्जिंग सुविधा दिली जाणार आहे. एटीजीएल देशातील खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी सीएनजी आणि पाईप असणारी घरगुती गॅस(पीएनजी)ची वितरक आहे.