नवी दिल्ली
स्वच्छ हरित ऊर्जेकरीता प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी हे 50 ते 70 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे समजते. 2030 पर्यंत जगातील सर्वात मोठी नूतनीकरण ऊर्जा निर्माण करणारी कंपनी होण्यासाठी कंपनीचे प्रयत्न असणार आहेत. अब्जाधीश गौतम अदानी सेंद्रीय आणि असेंद्रीय पद्धतीच्या विविध ऊर्जा क्षेत्रातील संधी दशकभरात साध्य करण्यासाठी झटणार आहे. याअनुषंगाने पुढील दशकापर्यंत 20 अब्ज डॉलर्स गुंतवण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे.