ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात पुस्तके उपलब्ध होण्याची शक्मयता : कोरोनामुळे प्रिंटींग छपाई विलंबाने
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारच्या आदेशानुसार 2021-22 शैक्षणिक वर्षाला 1 जुलैपासून सुरुवात झाली. शैक्षणिक वर्षाला जरी सुरुवात झाली असली तरी शिक्षण विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे अद्याप विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध झालेली नाहीत. छपाईचे काम अद्याप पूर्ण नसल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ानंतरच पुस्तके उपलब्ध होण्याची शक्मयता आहे. शिक्षण विभागाच्या गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे मात्र शैक्षणिक नुकसान होत आहे.
दरवषी जून महिन्यात शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांची उजळणी व्हावी यासाठी सेतूबंध (ब्रिज कोर्स) घेतला जात होता. परंतु यावषी शैक्षणिक वर्ष उशिराने सुरू झाल्याने जुलै महिन्यात सेतूबंध कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मागील इयत्तेच्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास दिला जात आहे. याच सोबत शिक्षण विभागाच्या नव्या आदेशानुसार सामर्थ्यावर आधारित महत्त्वाच्या घटकांची उजळणी केली जात आहे.
शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत बुक बँक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांची संख्या कमी-जास्त असल्याने विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होण्यास वेळ लागत आहे. सध्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने सेतूबंध सुरू असल्याने पुस्तकांची गरज नसली तरी नवीन अभ्यासक्रम सुरू होताच त्यांना पुस्तकांची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे लवकर पुस्तके उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
बेळगाव शिक्षण विभागाकडे अद्याप पुस्तके नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शिक्षण विभागाकडून पुस्तकांच्या छपाईचे काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात हे काम पूर्णपणे ठप्प झाल्याने आता छपाई सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवडय़ानंतरच पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहचणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकांसाठी अजून काही दिवस थांबावे लागणार आहे.