पहिलीच स्थायी समितीची बैठक गाजली
प्रतिनिधी/ बेळगाव
जिह्यातील सर्व हॉस्पिटल्सवर जिल्हा आरोग्याधिकाऱयांचे नियंत्रण असते. मात्र सध्या आरोग्य अधिकारी म्हणून कार्य करत असलेल्या शशिकांत मुन्याळ यांना आपले अधिकारच माहिती नसल्याचे हस्यास्पद गोष्ट स्थायी समितीच्या बैठकीत उघडकीस आली. यावर कहर म्हणजे जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनाही आपले अधिकार काय आहेत हे माहिती नाही. यामुळे हा एक चर्चेचाच विषय झाला आहे. सामान्य न्याय समितीच्या पहिल्याच बैठकीत अधिकाऱयांचा ढोंगीपणा उघड झाला.
ज्या अधिकाऱयांना आपले अधिकार माहिती नाहीत ते काय विकास साधरणार? असा प्रश्न आता उपस्थित होवू लागला आहे. या प्रकारावरुन जिल्हा पंचायत म्हणजे ग्राम पंचायत आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी खासगी हॉस्पिटल्स मनमानीपणे सर्वसामान्य जनतेकडून रक्कम उकळत आहे. बिले अमाप लावत आहेत. प्रसुतीसाठी एका महिलेकडून तब्बल दोन लाख रुपये वसुल करण्यात आले आहेत तर कोविड झालेल्या रुग्णांकडून 20 लाख ते 25 लाख रुपये उकळण्यात आले आहेत. यावर तुमचे नियंत्रण नाही का? असे विचारले असता आम्हाला अधिकार नाही म्हणून आरोग्य अधिकाऱयांनी सांगितले. यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले.
जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी तर या उत्तरामुळे डोक्मयालाच हात लावला. यावर आणखी एक मोठी हस्यास्पद गोष्ट म्हणजे जिल्हा पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. यांनी देखील आम्हाला कारवाईचा अधिकार नसल्याचे सांगितले. जर यांना अधिकार नसतील तर खासगी रुग्णांवर कुणाचे नियंत्रण असते? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वास्तविक आरोग्य अधिकाऱयांकडे सर्व अधिकार दिलेले असतात. जे हॉस्पिटल्स रुग्णांकडून अधिक रक्कम उकळतात. त्यांच्यावर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार आरोग्याधिकाऱयांना असतो. याचबरोबर जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांनाही अधिकार असतात. असे असताना आम्हाला अधिकार नाहीत म्हणून सांगणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे असाच प्रकार आहे.
सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न
कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वेठीस धरण्याचा प्रयत्न अनेक खासगी हॉस्पिटल्सनी केला आहे. त्यामुळे सरकारने अनेक हॉस्पिटल्सना कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर काही हॉस्पिटल्सनी जणू कोरोना म्हणजे महाभयंकर रोग आहे असे भासवून अव्वाच्यासव्वा बिले आकारली. प्रसुती महिलांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी हवे तेवढे पैसे घ्या. मात्र आमच्या रुग्णाला बरे करा, अशी विनवणी केली. मात्र कोणतीच मानुसकी नसलेल्या काही हॉस्पिटल्सच्या चालकांनी वारेमाफ बिले वसुल केली, असा आरोप जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील यांनी केला.
आरोग्याधिकारी व जिल्हा पंचायतच्या अधिकाऱयांनी आपणाला अधिकार नाही म्हणून उत्तरे दिल्यानंतर इतर सदस्यांनी त्यांना जोरदार विरोध करणे गरजेचे होते. मात्र बाकीचे काही जण मूग गिळून गप्प बसले. हे योग्य आहे का? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. एकूणच कोरोनाचे कारण पुढे करुन अनेकांनी सर्वसामान्य जनतेची लुट केल्याचे दिसून येत आहे. अधिकाऱयांच्या या उत्तरावरुन अधिकारीही त्यामध्ये सामील असल्याचा संशय व्यक्त होत आहे.
स्थायी समितींची निवड झाल्यानंतर पहिलीच बैठक होती. त्याबद्दल सर्व नवीन सदस्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष अरुण कटांबले व इतर सदस्य आणि अधिकारी उपस्थित होते.